स्वातंत्र्याची सत्तरी : चिंता आणि चिंतन
भारतासारख्या बहुजातीय, धार्मिक आणि भाषिक समाजात सहज ‘इतर’ ठरवले जातात. इतरांच्या नको त्या प्रतिमा निर्माण केल्या जातात, नको त्या प्रकारे चित्रित केल्या जातात. जाती-धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करणारे लोक या गोष्टी जाणीवपूर्वक करतात, पण सर्वसामान्य लोक न कळत काही वेळा अशा गोष्टी करत असतात. देशातील समकालीन गंभीर सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय प्रश्नाची चर्चा करणं गरजेचं आहे.......